आंब्याच्या मार्केटिंगसाठी शासन बागायतदारांना मदत करेल - विनोद तावडे
रत्नागिरी, दि. 05 - कोकणातील आंब्याला हमी भाव मिळाला पाहिजे. तसेच सर्वस्वी दलालांवर अवलंबून असल्याने बागायतदारांना चांगला दर मिळत नाही. यासाठी बागायतदारांना आंब्याच्या मार्केटिंगसाठी शासन सहकार्य करेल. भाजप सरकारमुळे कोकणात मोठ्या प्रमाणात विकास व प्रगती सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. शेतक-यांच्या समस्या ऐकून घेणे व केंद्र, राज्य शासन काय करत आहे, याची माहिती पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी पर्वानिमित्त भाजपतर्फे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या शिवार संवाद यात्रेत आज रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील चिपळूणकर यांच्या श्रीराम मंदिरात श्री. तावडे यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपाठीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, सरचिटणीस प्रा. नाना शिंदे, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, सरचिटणीस दादा दळी, पावसच्या सरपंच ममता गुरव उपस्थित होत्या.
श्री. तावडे यांनी सांगितले की, मागील सरकारने पंधरा वर्षांत न केलेली कामे फडणवीस सरकारने गेल्या अडीच वर्षांत पूर्ण केली आहेत. जलशिवार योजनेतून पाणी साठवले व त्याचा उपसा करण्यासाठी शेतीपंपांच्या लाखो जोडण्या दिल्या. अडत व्यापारी शेतकर्यांची पिळवणूक करत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील हे व्यवहार बंद केले. यामुळे शेतकर्यांचा फायदा झाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना दिले जाणारे भाडे शंभर टक्के द्यावे, अशा सूचना दिल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. या वेळी आंबा बागायदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी बागायतदारांच्या समस्या मांडल्या. फयान वादळापासून शेतकरी रडकुंडीला आला आहे. मात्र कोकणी शेतकरी आत्महत्या करत नाही. बागायतदारांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्ज फेडण्यात अडचणी येत आहेत. यासाठी आंब्याला हमी भाव मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी पिंट्या खातू, प्रवीण शिंदे, संतोष सुर्वे, अजय शिंदे, सुरेश गुरव, सुधीर पाथरे, पिंट्या गुळेकर, अशोक साळुंखे, श्री. दामले, जयंतराव देसाई आदींसह अनेक शेतकरी, बागायतदार, महिला उपस्थित होत्या.