Breaking News

नाशिक शहर व जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

नाशिक, दि. 27 - नाशिक शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद-उल-फित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा भरात मुस्लीम बांधवांनी  सामुहिक नमाज पठन करीत चांगल्या पावासह देशाच्या शांतता व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
ईद निमित्त मुस्लीम बांधवांवर सर्व धर्मियांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यानिमित्ताने धार्मिक सलोख्याचे दर्शन घडत आहे.आज सकाळी नाशिकच्या ईदगहा  मैदान येथे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.
यावेळी नाशिक महानगर पालिकेच्या वतीने रमझान ईद च्या पार्श्‍वभूमीवर ईदगहा मैदानावर हाफीज हिसमोद्दीन अशरफी शेर ए खतीब यांना व मुस्लिम बांधवाना महापौर  रंजना भानसी व पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप,उ पमहापौर प्रथमेश गीते, सभागृह  नेते दिनकर पाटील, स्थायी समिती शिवाजी गांगुर्डे गटनेते शाहू खैरे,प्रभाग सभापती डॉ हेमलता पाटील,भाजपा नेते लक्ष्मण सावजी ,माजी मंत्री डॉ शोभा  बच्छाव,नगरसेवक अरुण पवार,जगदीश पाटील,विनायक पांडे,समीर कांबळे नगर सेविका वत्सला खैरे,डॉ दिनेश बच्छाव,मीर मुक्तार अशरफी,ज नसंपर्क अधिकारी  यशवंत ओगले,हिरामण जगझाप,बाळासाहेब शिंदे,नितीन गंभीरे,संतोष काने आदी उपस्थित होते.