रत्नागिरी-मुंबई मार्गावर एसटीच्या शिवशाही बस सुरू करण्याचा प्रस्ताव
रत्नागिरी, दि. 02 - रत्नागिरी- मुंबई मार्गावर शिवशाही गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी एसटी विभागाने पाठविला आहे. वातानुकूलित शिवशाही गाड्या रत्नागिरीच्या ताफ्यात दाखल झाल्यास उत्पन्नात भर पडेल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी विभागाने गाड्यांचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला असून त्यावर काही महिन्यांत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती एसटीच्या रत्नागिरी विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के यांनी दिली.
एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त एसटी विभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी श्री. वळवी उपस्थित होते.
विभागात सध्या पुरेसे चालक, वाहक नाहीत. परंतु या चालक, वाहकांनी डबल ड्युटी करून, प्रसंगी घरातील कार्यक्रमास अनुपस्थित राहून जादा कामगिरी केली. यामुळे एसटीची सेवा सुरळित राहिली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याबद्दल विभाग नियंत्रकांनी चालक, वाहकांचे विशेष कौतुक केले.
विभागातील सर्व 820 एसटी गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा बसवण्यात आली आहे. यामध्ये अपलोड केलेले चित्रपट, मालिका, खेळांचे सामने पाहता येऊ शकतात. शाळा सुरू होत असताना एसटी स्थानकांमध्ये शालेय पासची सुविधा व मोठ्या शाळांमध्ये एसटीचे कर्मचारी पासांचे वितरण करणार आहेत. पावसाळा सुरू होत असल्याने खराब रस्त्यांचे सर्वेक्षण एसटीने केले असून लवकरच काही ठिकाणच्या फेर्याप अर्ध्यापर्यंत व काही फेर्यां बंद कराव्या लागण्याची शक्यता आहे.
गेल्या एक एप्रिलपासून जिल्ह्यातील सहा मार्गांवर एसटीने सुरू केलेल्या शटल सर्व्हिसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण-खेड 13, चिपळूण-दापोली 32, चिपळूण-गुहागर 9, रत्नागिरी-लांजा 25, दापोली-खेड 17 आणि खेड-दापोली मार्गावर 26 फेर्या दररोज सोडण्यात येत आहेत. कॅशलेससाठी रत्नागिरी बसस्थानकात बसवलेल्या पीओएस मशिनद्वारे 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती देण्यात आली.
रत्नागिरी एसटी म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून ग्रामीण, दुर्गम भागात एसटीने प्रवास करून शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळणार्याअ प्रवाशांचे आज महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. येथील मुख्य बस स्थानकात विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के यांच्यासह सर्व अधिकार्यां नी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन सुखद धक्का दिला.
बसस्थानकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, नारळाच्या झावळांनी सुशोभन आणि मनोवेधक रंगावलीने प्रवाशांना आनंदित केले. या वेळी प्रवासी, एसटीचे कर्मचारी, अधिकारी आदींच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर स्थानकातून सुटणार्या् गाड्यांमधील प्रवाशांना अधिकारी, कर्मचा-यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अशा प्रकारे नेहमी एसटीनेच प्रवास करा, अशी विनंतीही अधिकार्यांकनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व बस स्थानकांमध्ये वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के यांनी सांगितले की, एसटीची स्थिती चांगल्या प्रकारे सुधारत आहे. नव्या गाड्यासुद्धा एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी, सुविधा देण्याकरिता प्रशासनाचा प्रयत्न आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहकांच्या मेहनतीमुळे प्रवाशांना चांगली सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ, यंत्र अभियंता (चालन) आर. एल. कांबळे, विभागीय वाहतूक अधीक्षक श्री. खाडे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद, स्थानकप्रमुख सागर पाटील, ए. बी. जाधव आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.