सातार्यात बळाचा नव्हे तर प्रेमाचा वापर करुन आंदोलनाला दिली दिशा
सातारा, दि. 6 : संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आंदोलनाने पेटला असतानाच छत्रपतींच्या सातारा या राजधानीत पोलिसांनी बळाचा वापर न करता प्रेमाचा वापर करुन आज सातारा येथील पोवई नाक्यावर आंदोलनाला नवी दिशा दिली. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान न करता गोरगरीबांना मोफत दूध वाटप करुन आंदोलनाला पोलिसांनी एक नवी दिशा दिली. या विधायक कामाची नोंद सातारकरांनी घेवून पोलीस खात्यात कार्यरत असणारी शेतकर्यांची मुलेसुद्धा या कामामुळे सुखावली.
शेतकरी संघटनेने कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 1 जूनपासून शेतकर्यांचा संप आयोजित केला होता. याची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडल्यानंतर त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. आज महाराष्ट्र बंद ची घोषणा केल्यानंतर तसेच किसान सभा, शेतकरी संघटनेचे काही नेते व राजकीय पक्षांनी या संपाला पाठिंबा दिल्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण पडला होता. आज सकाळी 11 वाजता सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करुन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलीस यंत्रणेने अत्यंत संयमाने आंदोलकांची समजूत काढून कोणत्याही मालमत्तेचे नुकसान न करता त्याचा विधायक पद्धतीने गोरगरीबांसाठी उपयोग करा, अशी विनंती केली. या विनंतीला मान देवून शेतकरी व डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोबत आणलेल्या दुधाचे अनेकांना मोफत वाटप केले. पोलीस व आंदोलकांना पाहून घाबरलेल्या प्रवाशांच्या हातात दुधाचे ग्लास देवून स्वागत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलक व पोलिसांचे कौतुक केले. काहीजणांनी पातेले भरुन दूध घरी घेवून गेले. आंदोलनासाठी आलेले कॉ. भगवानराव भोसले, अस्लम तडसरकर, चंद्रकांत खंडाईत, कॉ. शाम चिकणे, संजय जाधव, सागर भोगावकर, संजय पवार यांच्यासह आंदोलकांनी शांततेची भूमिका घेतली व विधायक आंदोलन सातार्यात होवू शकते, हे दाखवून दिले. यावेळी पोलीस उपअधिक्षक खंडेराव धरणे, पोनि नारायण सागवेकर, पोनि किशोर धुमाळ यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी कर्तव्य बजावले, त्याचबरोबर आपली शेतकरी कुटूंबियांशी असणारी नाळसुद्धा मजबूत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाची नोंद इतिहासात झाली असेल, असे म्हणता येईल. दरम्यान सातारा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.