अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त दिव्यांगांना शिवसेनेकडून मदत
म्हसवड, दि. 6 (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाला 50 वर्ष पूर्ण झाले असून व राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून म्हसवड शहर शिवसेनेतर्फे सेनेचे उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते अपंगांना सायकल व कुबड्याचे येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे माण तालुका संपर्क प्रमुख व मिरा भांईदरचे शहरप्रमुख व शंकरभाई विरकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेचे माण तालुका प्रमुख संजय भोसले, शहरप्रमुख राहूल मंगरूळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख शिवदास केवटे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, भाजपचे शहर उपाध्यक्ष सचिन राजमाने, सोमनाथ कवी हे उपस्थित होते.
बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण होत असून व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमचे मित्र शंकरभाई विरकर यांच्या संकल्पनेतून सायकल व कुबड्यांचे साहित्य वाटप करण्यात आले.
शंकरभाई विरकर म्हणाले, काहीजण स्वत:ला शिवसेनेचे नेते समजणारे इतरवेळी स्वत:च्या स्वार्थासाठी कुठल्याही पक्षाशी हात मिळवतात. पण शिवसेना ही अशा माणसाला कधीच शिवसैनिक मानत नाही. संजय भोसले, नितीन दोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अदित्य सराटे, विश्वास माने, प्रकाश डोंगरे, अमित कुलकर्णी, ऋषिकेश हजारे, सुनिल मगर, हर्षल रोकडे, श्रीकांत कदम, सोनू मदने यांनी परिश्रम घेतले.