Breaking News

अपोलो क्लिनिकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 30 - अंधेरी येथील अपोलो क्लिनिकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी झालेल्या कौटुंबिक सोहळ्यास मुख्यमंत्री  यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह आमदार विनायक मेटे, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलीस  आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अपोलो क्लिनिकच्या माध्यमातून पोलिसांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले जातात.त्यामुळे पोलिसांना निरामय जीवन लाभत  आहे. रुग्णसेवा देताना माणूसकी जपत अपोलो क्लिनिकने आपली कामगिरी केली आहे. यापुढेही डॉ. संजय कपोते यांनी या क्लिनिकच्या माध्यमातून असेच कार्य  करावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी डॉ. कपोते यांच्या कार्याचा गौरव करीत क्लिनिकला शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीमती फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत डॉ. कपोते यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून क्लिनिकचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी त्यांनी क्लिनिकची पाहणी केली.