रेपो दरात बदल नाही; रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर
नवी दिल्ली, दि. 08 - रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नसून रेपो दर 6.25 टक्के इतकाच राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो दरही 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. चलन गुणोत्तराचा दर 20 टक्के करण्यात आला आहे. हे नवे दर 24 जूनपासून लागू करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून यंदाच्या आर्थिक वर्षातील महागाईच्या दराविषयी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पहिल्या सहा महिन्यात महागाईचा दर 2 ते 3.5 टक्के इतका राहील, तर दुसर्या सहामाहीत हा दर 3.5 ते 4.5 इतका राहणार आहे. समितीची पुढील बैठक 1,2 ऑगस्ट रोजी होणार आहे.