शहरात बस फे-यांची संख्या वाढविण्यासाठी मनविसेची मागणी
नाशिक, दि. 02 - एसटी महामंडळाने कमी केलेल्या शहर बस फे-यांची संख्या वाढविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, मनसे शहर सरचिटणीस प्रवीण भाटे, शहर संघटक विजय आगळे, मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, शहरात 15 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. त्यातच महामंडळाने बस फे-या कमी केल्या आहेत. शिक्षणासाठी शहरात आजूबाजूच्या खेड्यांतून अनेक विद्यार्थी येतात. मात्र, याच परिस्थितीत परिवहन महामंडळाने शहर बस फेर्या कमी केल्या असून, हजारो विद्यार्थी हे शहर बसने प्रवास करतात. फेर्या कमी करण्याचा निर्णय नागरिक, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक, मानसिक त्रासदायक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दि. 15 जूनपूर्वी शहर बस फे-या पूर्ववत चालू कराव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी शहर सरचिटणीस प्रतीक गवळी, मनीष थेटे, मनसे कार्यालयीन अध्यक्ष मनोज कोकरे, मनविसे शहर सरचिटणीस अमोल भालेराव, चिटणीस रोहन कोकरे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.