Breaking News

जळगाव येथे 3 जून रोजी पाणी परिषद, जलतज्ज्ञांची उपस्थिती

जळगाव, दि. 02 - पाणी समस्या उद्भव, त्यामागील कारणो आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात विचारमंथन करुन ग्रामपातळीपर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा  हा संदेश पोहोचविण्यासाठी राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जळगाव येथे शनिवार  दि. 3 जून रोजी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देशातील मान्यवर जलतज्ञांसह जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी सहभागी होणार  आहेत. या परिषदेत पाणी बचत आणि स्वच्छ भारत अभियान या विषयी जाणीव जागृती केली जाणार आहे.
जिल्हयातील पाणी समस्या, वाढणारे तापमान व कमी होणारे पर्जन्यमान हा चिंतेचा विषय आहे. त्यावर मात करण्यासाठी पाणी अडविणो व जिरविण्याचे तसेच  पुनर्भरणाच्या विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यासाठी शनिवार दि. 3 जून रोजी सकाळी दहा ते सायं.पाच वाजेपर्यंत पाणी परिषदेचे आयोजन पदवी प्रदान  सभागृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले आहे. या परिषदेस मागदर्शक म्हणून जागतिक जलतज्ञ, राजेंद्रसिंह, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष  डॉ. माधवराव चितळे, कोल्हापूरचे स्वच्छता दूत भारत पाटील, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे  म्हणून वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरु  प्रा. पी. पी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील, जळगाव महानगर पालिकेचे महापौर नितीन  लढ्ढा,खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षाताई खडसे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपुर्व हिरे, स्मिताताई वाघ, चंदूलाल पटेल, तसेच आमदार  एकनाथराव खडसे, डॉ. सतिष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणो, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, उन्मेश पाटील, किशोर पाटील हे उपस्थित  राहणार आहेत. या परिषदेस जल क्षेत्रातील जागतिक किर्तीच्या अत्यंत अनुभवी व कुशल मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेस जिल्हयातील सर्व  ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.