Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : सायना, सिंधूची पुढील फेरीत धडक

सिडनी, दि. 22 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरी लढतींमध्ये भारताच्या लोकप्रिय खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केला.  सायना नेहवालने कोरियाच्या स्युंग जी ह्यून हिचा तर पी. व्ही. सिंधूने जपानच्या सकाया सातो हिचा पराभव केला. सायनासाठी ही लढत फारच सोपी गेली. तिने स्युंग  हिला 21-10, 21-16 अशा सरळ गेममध्ये सहजतेने पराभूत केले. सिंधूला विजयासाठी थोडेसे जास्त झुंजावे लागले. तिने सातो हिला 21-17, 14- 21,  21-18 अशा फरकाने नमवले.