Breaking News

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली, दि. 22 - दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने येथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याप्रमाणेच दिल्लीमध्ये  देखीलही याच स्वरुपाचा हल्ला करण्याचा कट रचला आहे. याकारणास्तव बसस्थानक, रेल्वे स्थानक, पंचतारांकित हॉटेल्स, मॉल, बाजरपेठ, धार्मिक स्थळे, दुतावास,  मेट्रो स्थानक, विमानतळ, स्टेडिअम, पर्यटन स्थळे येथील सुरक्षेत वाढ केली आहे.
गुप्तचर यंत्रणेनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 7 दहशतवाद्यांनी दिल्लीमध्ये घुसखोरी केली असून लंडनप्रमाणेच येथे हल्ला करण्याचा कट रचत आहे. केंद्रीय गृह  मंत्रालयाकडून या प्रकरणी शोध सुरु असून 26 जूनपर्यंत ईद असल्याने दिल्लीमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.