Breaking News

श्रीलंका दौर्‍यापूर्वी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती : राजीव शुक्ला

नवी दिल्ली, दि. 22 - भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल, असा विश्‍वास आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे  वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला.
कर्णधार आणि प्रशिक्षक या वादाला कंटाळून काल अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विंडिज दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाला सध्या  मुख्य प्रशिक्षकच नसल्याचे चित्र आहे. परंतु, श्रीलंका दौ-यापूर्वी भारतीय संघाला मुख्य प्रशिक्षक मिळेल, असे शुक्ला यांनी मंडळाच्या वतीने सांगितले.
भारतीय क्रिकेट मंडळाच्या अधिका-यांनी कोहली आणि कुंबळे यांच्यातील वाद शमवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे  कुंबळे यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला, असेही शुक्ला यांनी नमूद केले.