Breaking News

कंपनीची प्रतिमा मलीन केल्यास निवृत्तीनंतरच्या सुविधा बंद होणार - एअर इंडिया

नवी दिल्ली, दि. 29 - निवृत्त कर्मचा-यांनी समाज माध्यमांमध्ये कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास अशा कर्मचा-यांना त्याचे परिणाम भोगावे  लागतील,असे एअर इंडिया कंपनीकडून निवृत्त कर्मचा-यांना सांगण्यात आले.
फेसबुक, ट्वीटर व्हॉट्सप किंवा अन्य कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कंपनीविषयी नकारात्मकता पसरवल्यास त्यांना निवृत्तीनंतर देण्यात येणा-या सुविधा बंद करण्यात  येतील. 21 जून रोजी जारी केलेल्या एका आदेशामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीने निरीक्षण केले आहे. कंपनीतील काही निवृत्त अधिकारी कंपनीविषयी नकारात्मकता पसरवत असून कंपनीची प्रतिमा मलीन करत  आहेत, त्यामुळे या पुढे कंपनी हे सहन करणार नसून अशा निवृत्त कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल, असे कंपनीचे कार्यकारी संचालक अरुणा गोपालकृष्ण यांनी  सांगितले.निवृत्त कर्मचा-यांना कंपनीकडून प्रवास खर्च, आरोग्य सेवा यांसह अनेक सेवा पुरविल्या जातात.