Breaking News

पोलीस आयुक्त महेश भागवत ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अ‍ॅवार्ड’ने सन्मानित

हैदराबाद, दि. 29 - तेलंगणामधील हैदराबाद-राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अ‍ॅवार्ड’ देऊन गौरवले. हा  पुरस्कार मानवी तस्करी रोखण्यासाठी महत्वपूर्ण काम करणार्‍या जगभरातील प्रेरणादायी व्यक्तींना देण्यात येतो. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टिलरसन आणि सल्लागार  इवांका ट्रम्प यांच्या हस्ते महेश भागवत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांचे मुलभूत अधिकार परत करण्याचे काम हैदराबाद-राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केले आहे.  पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच अमेरिकेत पार पडला असून काही कारणास्तव भागवत पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. महेश भागवत हे  महाराष्ट्रातील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या 13 वर्षापासून ते मानवी तस्करीविरोधात कार्य करत आहेत.