भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे पाच जवान ठार, सहा जखमी
श्रीनगर, दि. 02 - पाकिस्तान सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकचे पाच जवान ठार तर सहा जवान जखमी झाले आहेत. येथील भीमबेर व बट्टाल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
नियंत्रण रेषेवरील भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर पाकच्या परराष्ट्र कार्यालयाने भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी. सिंग यांना बोलाऊन स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. गुरूवारीच पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टर व केजी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. त्यात भारताचा एक जवान जखमी झाला होता. तर दोन नागरिक जखमी झाले.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले की, नौशेरामध्ये सकाळी 7.20 वा. व कृष्णाघाटी भागात सकाळी 7.40 वा गोळीबारास सुरूवात झाली. याशिवाय गुरूवारी सोपोरच्या नाथीपोरा भागात जवान म दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद ठार झाले.