Breaking News

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 25 तालिबानी दहशतवादी ठार

काबुल, दि. 02 - अफगाणिस्तानमधील काबुल येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई  हल्ल्यात 25 तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. तर 2धिक जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानमधील उरूजगनमधील सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने तरीनकोट शहराजवळीत भागात बुधवारी रात्री हा हल्ला केला. या  हल्ल्यात एक दहशतवादी नेताही ठार झाला आहे.
अमेरिकेच्या कारवाईसह अफगाणिस्तानकडून तालिबानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जात आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तालिवानी दहशतवाद्यांना  या हल्ल्यानंतर तातडीने फाशी देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.