राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळात दोन महत्वपूर्ण दया याचिका फेटाळल्या
नवी दिल्ली, दि. 18 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन महत्वपूर्ण दया याचिका फेटाळल्या आहेत. बलात्कार आणि हत्येप्रकरणा संबंधित दोन्ही याचिकांवर मुखर्जी यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यात आपला अंतिम निर्णय दिला होता. यातील पहिले प्रकरण हे इंदूरचे आहे तर, दुसरे पुण्याचे आहे.
2012 मध्ये इंदूरमध्ये तीन जणांनी एका चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. तर, दुसरे प्रकरण हे पुण्यातील असून एका कॅब चालकाने आणि त्याच्या मित्राने एका सॉफ्टवेअर अभियंता महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मुखर्जी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 30 दया याचिका फेटाळल्या आहेत.