Breaking News

‘पुष्पगुच्छ ऐवजी एक पुस्तक द्या’; पंतप्रधान मोदी यांचे नवीन घोषवाक्य

नवी दिल्ली, दि. 18 - एक पुष्पगुच्छ ऐवजी एक पुस्तक द्या, अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.  शुभेच्छा म्हणून नागरिकांनी पुष्पगुच्छ ऐवजी  पुस्तक द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. यामुळे फार मोठा बदल घडू शकतो. केरळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. 100 टक्के साक्षरता  असलेले केरळ हे एकमेव राज्य असल्याचे मोदी यांनी यावेळी नमूद केले.
वाचनापेक्षा जास्त आनंददायक गोष्ट नाही आणि ज्ञानापेक्षा अधिक शक्ती असू शकत नाही. केरळ हे देशाला साक्षरतेत एक प्रेरणादायक आहे. यासाठी केवळ केरळ  सरकारला श्रेय देणे योग्य ठरत नाही. तर, यासाठी येथील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय भूमिका बजावली असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.