विमान प्रवासावर बंदी असूनही खा. रेड्डी युरोपला रवाना
नवी दिल्ली, दि. 18 - विमान प्रवासावर बंदी केली असतानाही तेलगू देसम पार्टीचे खासदार जे सी दिवाकर रेड्डी हे आज विमानाने युरोपला रवाना झाले. रेड्डी यांच्या देशांतर्गत विमान प्रवासावर कंपन्यांनी बंदी घातली आहे . रेड्डी हे आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांच्या विमानातून युरोपला रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जात असताना दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ घातला होता. रेड्डी हे विमानतळावर उशिरा पोहचले. त्यानंतर चेक इन काऊंटर बंद झाले होते. त्यामुळे रेड्डी यांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे रेड्डी यांनी संतापून कर्मचार्यांना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्ससह एअर इंडिया, स्पाईस जेट, जेट एअरवेज, विस्तारा, गो एअर, एअर एशियाने या कंपन्यांनी रेड्डी यांच्यावर बंदी घातली.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचार्याशी वाद घातल्यामुळे त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घातली गेली होती. त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.