Breaking News

मानवाधिकारावर विश्‍वास असून मी त्याचा सन्मान करतो - लष्करप्रमुख बिपीन रावत

श्रीनगर, दि. 18 - माझा मानवाधिकारावर विश्‍वास आहे. काश्मीरच्या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल. भारतीय सैन्य हे परिस्थिती पाहून कारवाई  करते , असे वक्तव्य लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले. लष्करप्रमुख बिपीन रावत यांना एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात  आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आमच्यासाठी नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. मानवाधिकाराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. जम्मू-काश्मीरच्या  नागरिकांमध्ये अनेक जण अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. येथील तरुणांवर चुकीचे कृत्य करण्यासाठी दबाव टाकला जातो. अशा प्रकारची स्थिती सांभाळण्यास  आम्ही सज्ज आहोत, असे त्यांनी नमूद केले.