अमरनाथ यात्रेसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ; 30 हजार जवान तैनात
श्रीनगर, दि. 18 - अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी 30 हजार जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहशतवादाचे संकटाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचे अधिका-यांनी सांगितले. यात्रेतील भाविकांवर हातबॉम्बने हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरनाथ यात्रा 2 जुलैपासून सुरू होत आहे. गेल्या वर्षीही पाकिस्तानने या यात्रेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानातून घुसखोरी करण्यात येऊ शकते किंवा आधीपासूनचे घुसखोर भारतात घुसले असून ते यात्रेकरूंना लक्ष्य करू शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यात्रेकरुंना देण्यात येणा-या सुविधांवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष देत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने हालचाली वाढल्यापासून येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे रोखण्यासाठी आवश्यक ती योग्य पावले उचलली जात असल्याचे जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक दानिश राणा यांनी सांगितले. यावेळी येथील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी 20-25 ड्रोनचा वापर केला जाणार आहे.