चॅम्पियन्स करंडकासाठी भारत-पाकिस्तान आमने-सामने
मुंबई, दि. 18 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी लंडनमध्ये झुंजणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेत अद्याप पाकविरूद्ध भारत अजिंक्य आहे. मात्र, उद्या हे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे दोन्ही संघांवर थोडे दडपण असेल.
भारतीय संघाने या स्पर्धेच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती, ही भारतासाठी सुखदायक गोष्ट आहे. पण, त्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेत केलेले धक्कादायक पुनरागमन भारताला विसरून चालणार नाही. पाकिस्तानी संघाची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. पाकिस्तानने सलग तीन सामन्यात गोलंदाजीच्या बळावरच सामने जिंकले आहेत. विरोधी संघाला स्वस्तात तंबूत धाडणे आणि मग माफक आव्हान सहज पार करणे, हा पाकिस्तानचा सध्याचा विजयाचा मूलमंत्र आहे.
पहिल्या सामन्यात भारताने झोडपून काढलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजीत आता जुनेद खानचा समावेश झाला आहे. तीन सामन्यात 9 बळी टिपणारा हसन अली, फिरकीपटू इमाद वसीम आणि मोहम्मद हाफीज हेदेखील भारताची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची फलंदाजी हा त्यांच्यासाठी काहीसा चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक अनुभवी फलंदाज असूनही पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता येईलच, याची शाश्वती अद्यापही देता नसल्यामुळे भारताने पाकिस्तानला मोठे आव्हान दिल्यास भारताला जिंकण्याची संधी अधिक आहे.
भारताची फलंदाजी पाहता सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी 1-1 शतक करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. कोहली, युवराज, धोनी आणि केदार जाधव यांनीही वेळोवेळी आपली चमक दाखवली आहे. हार्दिक पांड्याही तडाखेबाज फलंदाजी करण्यास सक्षम आहे. संघाची फलंदाजी प्रभावी करण्यासाठी भारत चार गोलंदाजांसह सामने खेळला आहे आणि जिंकलाही आहे. मात्र या सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा, अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर गोलंदाजीचा ’ताण’ पडल्याचे जाणवले आहे. युवराज आणि केदार जाधव हे काही षटके टाकू शकत असले तरीही त्या दोघांनी मिळून टाकायच्या दहा षटकांमध्ये पाकिस्तानी फलंदाजांना सूर गवसला, तर भारतासमोर एक नवे आव्हान उभे राहू शकते. अशा परिस्थितीत भारताचा संघ कसा असेल, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.