Breaking News

लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर घुसखोरीचे प्रमाण कमी - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 02 - लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर सीमे रेषेवर होणा-या घुसखोरीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले.  सीमेवर त्रिस्तरीय सुरक्षा असायला हवी. सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांमध्ये समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सिंग म्हणाले. सीमा सुरक्षा दलाच्या  आयोजित एका कार्यक्रमात सिंग बोलत होते.
या पूर्वी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत होती. मात्र, लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. जवानांवर केवळ सीमेवरच्या सुरक्षेची  जबाबदारी नसून देशाची एकात्मता राखण्याचीही जबाबदारी आहे, असेही सिंग म्हणाले.
समाज माध्यमातून देशाचा शत्रू अफवा पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकदा जवान आणि अधिकारी कोणतीही खातरजमा न करता व्हॉटसअ‍ॅप किंवा फेसबुकवर  हे संदेश पसरवतात. त्यामुळे जवानांनी आणि अधिका-यांनी खातरजमा केल्याशिवाय असे संदेश पसरू नये, असे आवाहनही सिंग यांनी केले.