Breaking News

मिश्रांना मारहाण करणा-या आमदारांविरोधात कारवाई करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्ली, दि. 02 - दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांना मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आप  आमदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. नायब राज्यपालांची भेट घेऊन कपिल मिश्रा यांना मारहाण करणा-या दोषी आमदारांविरोधात तात्काळ कारवाई  करण्याची मागणी करणार, असे विधानसभेचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले.
विधानसभेत दिल्ली सरकारविरोधात बोलत असताना मिश्रा यांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. कोणत्याही प्रकारची सूचना न देता मिश्रा यांना  सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. याचदरम्यान आप आमदारांनी मिश्रा यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.