Breaking News

दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून औषध घोटाळ्याची चौकशी सुरू

नवी दिल्ली, दि. 02 - कपिल मिश्रा यांनी आप सरकारवर औषध घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आज दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी  करण्यास सुरूवात केली. औषधाचा साठा ठेवण्यात आलेल्या तीन गोदामांची पोलीस पथकाने चौकशी केल्याचे समजते. 
दिल्ली सरकारचा आरोग्य विभागामार्फत तीन घोटाळे झाले आहेत. दिल्ली आरोग्य विभागातर्फे औषधखरेदीमध्ये 300 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मिश्रा यांनी  केला. केजरीवाल सरकारने चुकीच्या पद्धतीने औषध खरेदी केली. औषधखरेदी केली असली तरी ती रुग्णालयांपर्यंत पोचलीच नाहीत. ही औषधे गोडाऊनमध्ये पडून  असून, त्यांची मुदत संपत आली आहे, असा आरोप मिश्रा यांनी केला होता.