शेतकरी संपामागील छुप्या शक्ती चवताळून उघडपणे मैदानात
औंरगाबाद, दि. 05 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनांच्या कोअर कमिटी सोबत यशस्वी चर्चा केल्यानंतर संप मिटल्याची घोषणा या संघटनांनी केल्याने सरकार विरोधी शक्ती चवताळून संप चालु राहवा यासाठी उघडपणे मैदानात उतरल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. इतके दिवस समोर न आलेल्या छावा व संभाजी बिग्रेड या संघटनांनी आज जाहिरपणे सरकार विरोधी भूमिका घेतली. लातूर येथे पत्रकार परिषद घेवून शेतक-यांसाठीच्या आंदोलनात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली. तर शेतक-यांचा संप मिटवण्यासाठी सरकारशी चर्चा करणारे जयाजी सुर्यवंशी यांच्या घरावर औरंगाबादेत अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड , मावळा संघटनेच्या पदाधिका-यांनी टोमॅटो फेकले.
लोकशाही मार्गाने आंदोलन करुनही यश येत नसल्याने शिवाय सरकारकडून फसवणूकच होत असल्यानं छावा संघटनेने या आंदोलनात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लहान, मोठा, कोरडवाहू, बागायती असा भेद न करता संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. शेतकरी सरणावर जाण्याची वाट सरकार पहात आहे. आता आम्ही शेतक-यांचे हात मजबूत करु, आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करु, उद्यापासूनच आमची आंदोलने सुरु होतील, शेतक-यांसाठी छावे छातीवर गोळ्याही झेलायला तयार असल्याचेही जावळे यांनी सांगितले. यावेळी विजयकुमार घाडगे, सोनेराव शिंदे, संजय राठोड, राजकुमार गुंजरगे, आकाश पाटील, बाळासाहेब सपाटे, बालाजी निकम, भगवान माकणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकर्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला कोंडीत पकडण्यातच काही संघटनांना स्वारस्य असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी आक्रमक पवित्रा घेवून हे अंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न आता या संघटना उघडपणे करीत आहेत.या संघटनांच्या अशा उन्मादामुळं शेतक-यांच्या मालाचे मात्र अदयाप किती दिवस नुकसान होणार आहे हा प्रश्न आहे .