Breaking News

रमजान ईद हा बंधुता व प्रेमाचा संदेश देणारा सण- आ. थोरात

संगमनेर, दि. 27 - भारतीय परंपरा ही विविधतेने नटलेली असून प्रत्येक सण हे एकात्मतेचा व नव आनंद देणारे असतात. पवित्र रमजानच्या उपवसानंतर येणारा रमजान ईद हा सण संपूर्ण विश्‍वाला एकात्मता, बंधुता, शांती व प्रेमाचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवा नेते सत्यजीत तांबे, विश्‍वास मुर्तडक, नितीन अभंग, अजय फटांगरे, गजेंद्र अभंंग, गणेश मादास, गुलाबराव ढोले, किशोर टोकसे, किशोर पवार, केशव मुर्तडक, शकील पेंटर, लाला बेपारी, बाळासाहेब पवार, लक्ष्मण बर्गे, कन्हैय्या कागडे, शफी तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पी. आय. गोविंद ओमासे, तहसीलदार कुमारी प्रियंका आंबरे आदि उपस्थित होते.
यावेळी ईद निमित्त शुभेच्छा देतांना आमदार थोरात म्हणाले, पवित्र रमजानचा उपवास हा परमेश्‍वरा जवळ जाण्याचा मार्ग आहे. या सणातून संबध विश्‍वाला शांती, एकत्मता बंधुता व प्रेमाचा संदेश मिळतो. रमजान सणामुळे परस्परांमध्ये स्नेह भाव वाढत असून संयम, त्याग, शांती व सहिष्णूता मानवाच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे. या सणाचे महत्व खुप मोठे आहे. ईद हा सण सर्वधर्मीय मोठया आनंदाने साजरा करत असून आपण कायम संगमनेर तालुक्यातील बांधवांच्या बरोबरच साजरा करीत आलो आहोत.
आ. डॉ. तांबे म्हणाले, विविध संस्कृतीनी नटलेल्या या देशात रमजानमुळे बंधूता वाढत असून संबंध विश्‍वाला मानवता धर्म हा शिकविणारा हा सण आहे. रमजानच्या प्रवित्र उपवासानंतर हा सण संपूर्ण भारतात मोठया आनंदाने साजरा होत असल्याचे हे भारताच्या एकात्मतेचे व समृध्दतेचे प्रतिक आहे.
याप्रसंगी लुकड्या पहिलवान, निखील पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे, अनिस शेख, गणेश गुंजाळ यांसह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.