Breaking News

अविनाश धर्माधिकारी यांचे आज संगमनेरात व्याख्यान

संगमनेर दि. 27 (प्रतिनिधी):- जयहिंद करिअर अ‍ॅकेडमी व संग्राम पतसंस्थेच्यावतीने माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे आज मंगळवार दिंनाक 27 जुन 2017 रोजी सायंकाळी 4.00 वा. मालपाणी लॉन्स येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली आहे. 
आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय प्रगतशील असून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रिडा क्षेत्रातही मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिंनाक 27 जुन 2017 रोजी सायंकाळी 4.00 वा. मालपाणी लॉन्स येथे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. थोरात व आ.डॉ. तांबे हेही उपस्थित राहणार आहे. यावेळी दहावी व बारावीनंतरच्या सर्व विद्यार्थ्यां व पाकलकांना मोफत प्रवेश असणार आहे
तरी या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे. असे अवाहन पतसंस्थेचे चेअरमन डॉ. एन. एस. शेख , मॅनेंजर उमेश शिंदे व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.