Breaking News

फिरकीपटू अश्‍विनच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत

लंडन, दि. 18 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सराव करताना फिरकीपटू रवीचंद्रन अश्‍विन याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली. या  दुखापतीनंतर तो सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र काही वेळातच अश्‍विन पुन्हा सरावासाठी परतला आणि त्याने गोलंदाजीचाही सराव केला.  चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी आज खेळपट्टीवर भारतीय संघ क्षेत्ररक्षणाचा  सराव करत होता. त्यावेळी अश्‍विनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.