Breaking News

नव्या बनावट नोटांची छपाई करणा-या दोघांना अटक

बीड, दि. 22 - बीड जिल्हयातील आष्ठी येथे घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून  काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
आष्टी शहरातील स्टेशन रोडवर शहानवाज सादेक या तरूणाचे बॉम्बे वॉच कंपनी अँड झेरॉक्सचे दुकान आहे. या झेरॉक्स मशीनवर तो बनावट नोटा तयार करीत  असल्याची माहिती बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्या प्रमाणे सदर कारवाई केली.शहानवाज खान हा केवळ सत्तावीस वर्षाचा असून त्याचा  साथीदार भरत मारुती लगडे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हा आहे दोघांनी मिळून या बनावट नोटा तयार करण्याचा उदयोग चालवला  होता.त्यांच्याकडे सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही रक्कम 2 लाख 15 हजार 743 एवढी आहे.