Breaking News

कृषीदुतांचे नवलेवाडीत स्वागत

अकोले, दि. 21 - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिट संलग्न मालदड येथील सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील  कृषीदुतांचे तालुक्याचे नवलेवाडी येथे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती व पाणी परिक्षण, किड व रोग एकत्रित व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेतकर्‍यांच्या  शेती संबंधित विविध समस्या व त्यावरील उपाय आदि विषयांचे सखोल विश्‍लेषण या कृषीदुतांकडून करण्यात येणार आहे. यामध्ये वैभव इधे, शुभम गेठे, कौस्तुभ  पावसे, पोपट बुळे, संदेश वाळे, प्रदिप महाले या कृषीदुतांचा समावेश आहे.
यासाठी कृषीदुतांचा जेष्ठ नेते मधुकरराव नवले, सरपंच भारती नवले, उपसरपंच राकेश देशमुख आदींनी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. हारदे, प्रा. दसपुते, प्रा. सांगळे, प्रा.  माने यांचे स्वागत केले.