कोल्याची कन्या अस्मिता भांगरेचा महापौरांच्या हस्ते सन्मान
अकोले, दि. 21 - अकोले तालुक्यातील मनोहरपूर येथील भूमिपुत्र व मुंबई येथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास असलेले गोरक्षनाथ भांगरे यांच्या कन्या कुमारी अस्मिता गोरखनाथ भांगरे हिने कल्याण येथील गजानन विद्यालयात इयत्ता दहावीच्या परिक्षेत 97.60 टक्के गुण मिळविले.
तालुक्यातील मनोहरपूर गावचे नाव मुंबई नगरीमध्ये झळकविण्यात अस्मिता हिला तिच्या मातोश्री छाया भांगरे व वडील शिक्षक गोरक्षनाथ भांगरे, तसेच तिला शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल कल्याण, डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, शाखाप्रमुख सतिश वायचळ यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अगस्ति कारखान्याचे माजी संचालक अॅड. सदानंद पोखरकर, मराठी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ब्राम्हणवाडा पतपेढीच्या अध्यक्षा सौ. कल्पना विलास आरोटे, यशोमंदिर पतपेढीचे संचालक अशोक वाळूंज, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सीताराम पा. देशमुख, जि.प. सदस्य रमेश देशमुख, भाजपाचे नेते शिवाजीराव धुमाळ, अशोकराव भांगरे, डॉ. किरण लहामटे, सौ. सुनिता भांगरे, कोतूळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय लोखंडे, माजी सैनिक नामदेव लोखंडे, निवृत्त शिक्षक नारायण लोखंडे, मंगेश लोखंडे, प्रशांत लोखंडे यांसह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.