Breaking News

पोलिसांना लागेना शेवगांव हत्याकांडाचा ‘सुगावा’

। मारेकर्‍यांची माहिती देणार्‍यास 50 हजाराचे बक्षिस जाहिर 

अहमदनगर, दि. 21 -  शेवगांव येथील हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांडाच्या तपासाला अजूनही दिशा मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस विभागाने मारेकर्‍यांची माहिती  देणार्‍याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणार्‍याचे नांवही गुपीत ठेवले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. विदयानगर भागातील हरवणे  कुटूंबाच्या घराची पाहणी आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पाहणी केली आहे.  यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधिक्षक  रंजनकुमार शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे, तपासी अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक सुरेश सपकाळे व इतर  अधिकारी यांनी चौभे यांना माहिती दिली.
शेवगांवच्या विद्यनगर भागातील अप्पसाहेब हरवणे, त्यांच्या पत्नी सुनंदा हरवणे, मुलगी स्नेहल व मुलगा मकरंद या चौघांची शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी गळे  कापून हत्या करण्यात आली. या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे एक, पोलिस उपअधीक्षक   कार्यालयाचे      एक, एलसीबीचे दोन, श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षकांचे एक, शिवाय दोन गुप्त अशी एकूण सात पथके कार्यरत आहेत. या घटनेचा तपास एलसीबीचे  पोलिस निरीक्षक दिलीप पवार  हे करीत आहेत.
घटनेला दोन दिवस उलटुन गेले आहेत. मात्र तरीही या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. दिशाहीन तपास असल्याने या हत्या  नेमके कोणत्या  कारणावरुन   झाल्या  याचा शोध  लावणे  पोलिसांना  कठीन झाले आहे. त्यामुळे हत्या करणार्‍यांची  माहिती देणार्‍याला पोलिस विभागाच्यावतीने 50 हजार    रुपयांचे   बक्षीस   जाहीर  करण्यात आले आहे. माहिती  देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात  येईल   असे   सांगण्यात आले आहे.
माहितीदेण्यासाठी उपअधीक्षक शिवथरे मो.नं.9766703296,  व पीआय सपकाळे मो.नं.9823295777 यांच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.