Breaking News

एम्पथी फाउंडेशनकडून पाळधीतील जि. प. शाळेसाठी एक कोटींचा धनादेश

जळगाव, दि. 20 - जिल्ह्यातील पाळधी जि. प. शाळेची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्याना बसण्यास अडचणी येत होत्या ,  तालुक्यातील मोठ्या गावाची व हायवेवर असलेल्या शाळेची अवस्था बघून भाऊनी एम्पथी फाउंडेशन मुंबई यांचेकडे सदर शाळेच्या नूतन इमारतीची मागणी केली, ती  त्यांनी मान्य केली व एक कोटी रु.चा निधी मंजूर केला.
सदर एक कोटी रुपयांचा धनादेश नुकताच केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, जलसंपदामंत्री गिरीश भाऊ महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, एम्पथी  फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुंदरेश्‍वरम् , श्री. पिपलिया यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए. टी. नाना  पाटील, आमदार चंदूभाई पटेल, स्मिताताई वाघ, हरिभाऊ जावळे, उन्मेष दादा पाटील, रामेश्‍वर भाऊ नाईक, अरविंद भाऊ देशमुख उपस्थित होते. जि. प. शाळा  पाळधी नूतन इमारत प्रारंभ या कोनशीलेचे अनावरण मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.