10 वर्षांनी होणार ‘रेल्वे सुरक्षा परिषद’
मुंबई, दि. 20 - मध्य रेल्वे मजदूर संघ आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी रेल्वेच्या पाच विभागांसाठी एक दिवसाच्या सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वेच्या सभागृहात तब्बल 10 वर्षांनी ही परिषद होणार आहे. या परिषदेत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वेचे कर्मचारी आणि कामगार थेट आपली मते आणि सूचना मांडणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे. मध्य रेल्वे मजदूर संघाचे मंडल अध्यक्ष व्ही.एस. सोलंकी यांच्यातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
देशभरातील रेल्वेचा सिग्नल आणि टेलिकॉम हा एक महत्वाचा विभाग आहे. कोठेही सिग्नल यंत्रणा कोलमडली की संपूर्ण वेळापत्रक बिघडते. ही यंत्रणा हाताळणारे कर्मचारी आणि कामगार आपला जीव धोक्यात घालूनही 24 तास काम करत असतात. सन 1977 ते 78 या काळात रेल्वेचे नऊ झोन व 21 लाख कर्मचारी असे समीकरण होते. मात्र आज झोनची संख्या 17 झाली असली तरीही कर्मचारी संख्या घटून केवळ 13 लाख 20 हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी सिग्नल आणि टेलिकॉम विभागात कार्यरत असणारे केवळ 63 हजार कर्मचारी आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर झपाटयाने वाढत असून कर्मचारी वर्गदेखील सुशिक्षीत आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण असा आहे. परिणामी, रेल्वे प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी काय करावे, या संदर्भात कर्मचारी आणि अधिकारी या परिषदेत नवे विषय मांडणार आहेत. या परिषदेला रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.