Breaking News

आजपासून दिल्लीमधील 55 पैकी 43 मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट बंद राहणार

नवी दिल्ली, दि. 30 - दिल्लीमध्ये आजपासून 55 पैकी 43 मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. मॅकडोनाल्ड आणि कनॉट प्लाझा रेस्टॉरंट समूहामधील  (सीपीआरएल) वादांमुळे हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या निर्णयामुळे 1 हजार 700 कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा आली आहे. 
हा निर्णय योग्य नाही मात्र तरी काही कारणांमुळे सीपीआरएलतर्फे चालवण्यात येणारे 43 मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट तात्पुरते बंद करण्यात येत आहेत, असे विक्रम बक्क्षी  यांनी सांगितले. विक्रम बक्क्षी हे सीपीआरएलच्या मंडळावर कार्यरत आहेत. मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटबंद करण्याचा निर्णय का घेतला गेला यामागचे मूळ कराण अद्याप  जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आरोग्यासंबंधी बंधनकारक असलेल्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.