Breaking News

पाकिस्तानच्या बचावात चीन, त्यांचे दहशतवादविरोधी प्रयत्न दुर्लक्षित होऊ नयेत

बीजिंग, दि. 29 - पाकिस्तानातील भूप्रदेशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ देऊ नका, अशी तंबी भारत व अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आल्यानंतर  चीन पाकच्या बचावासाठी पुढे सरसावले आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात पाकिस्तान कायम अग्रणी राहिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने ही बाब मान्य  करणे आवश्यक आहे, असे चीनने पाकच्या बचावात म्हटले आहे. 
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले की, आम्ही दहशतवादाचा विरोध करतो. मात्र, कुठल्याही एका देशाला दहशतवादाशी जोडण्याच्याही आम्ही  विरोधात आहोत. दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तान अग्रणी स्थानावर आहे. त्यांच्याकडून करण्यात येणारे प्रयत्न आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्लक्षित करू शकत नाही,  असे म्हणाले. शिवाय दहशतवाद विरोधी लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.