Breaking News

संगणक परिचालक हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा

बुलडाणा, दि. 29 - मागील 10 महिन्यांपासून संगणक परिचालकांना नियुक्ती नाही, शासनाला सांगून सुद्धा फरक पडत नसल्याने आंदोलन तीव्र करत हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येत असून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संगणक परिचालक संघटना अध्यक्ष नीलेश खूपसे यांनी केले. अनेक संगणक परिचालकांनी नियुक्ती मिळाली नाही, कंपनीकडून कॅम्प घेण्यात आले. मात्र, संगणक परिचालकांनी नियुक्ती मिळाली नाही, शिवाय जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडून आश्‍वासन मिळत नाही. कारण याबाबत त्यांनाच काही गोष्टीचा उलगडा झालेला दिसत नाही. जे संगणक परिचालक नियुक्त झाले आहेत जे संगणक परिचालक नियुक्त झाले नाही अशा संगणक परिचालकांनी काम व्यवस्थितरीत्या सुरू ठेवले होते. प्रिया सॉफ्ट इयर क्लोजिंग असेल इतर काम सुरू आहे. मात्र गेल्या 10 महिन्यापासून राहिलेले संगणक परिचालक नियुक्तीचे वाट पाहत आहे. सीएससी-एसपीव्ही कंपनीकडे महाराष्ट्र सांभाळण्यासाठी मोजता येईल एवढेच लोक नियुक्तीची प्रक्रीया सांभाळत आहे. कंपनीने जे जिल्हा तालुका स्तरावर व्यवस्थापक नेमून दिलेत ते फक्त कठपुतली आहे. खर्या अर्थाने कंपनीने त्यांच्या हातात नियुक्तीचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे अधिकार कंपनीकडे असल्याने कंपनीच नेमकं काय चाललंय हेच कळत नाही. ज्या ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकाची नियुक्ती झालेली नाही त्या ग्रामपंचायत कडून शासनाने तीन महिन्याची आगाऊ रक्कम वसूल केलेली आहे. त्या वसूल केलेल्या रक्कमेचा फायदा कोणाला हा प्रश्‍न आहे. यासाठी 27 हजार संगणक परिचालक आंदोलन करणार आहेत.