Breaking News

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 29 - चीनने कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणा-या भाविकांना अनुमती न दिल्याने विश्‍व हिंदू परिषदेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन  केले आहे. 
चीनने 50 भाविकांना प्रवेश नाकारला आहे. चीनने सिक्किममधील नाथूला मार्गे जाणा-या भाविकांना प्रवेश नाकारला आहे. चीनने भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे विश्‍व  हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली असून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तिबेटवर चीनचा डोळा आहे. त्यावर चीनने  अवैधरित्या ताबा मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी व्यक्त केली.