Breaking News

शेतकरी संपावर जाणे आम्हाला भूषणावह नाही - मुनगंटीवार

नांदेड, दि. 02 - शेतकरी संपावर गेला, ही बाब आमच्या सरकारसाठी भूषणावह नाही, असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. नांदेडमध्ये  ते बोलत होते. आजवर राज्यात शेतकरी हिताच्या धोरणांची गती अत्यंत धीमी होती. पण मागील अडीच वर्षांच्या काळात ही गती वाढली. कर्जमुक्तीऐवजी भविष्यात  शेतकरी कधीच कर्जाच्या दुष्टचक्रात अडकू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आई संपावर जाणे आणि शेतकरी संपावर जाणे सारखेच आहे. असेही अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.