Breaking News

पालकमंत्र्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादीची मागणी

ठाणे, दि. 02 - ठाण्यात हजारो इमारती हजारो इमारती पडण्याच्या उंबरठ्यावर असताना या इमारतींचा विकास क्लस्टर शिवाय शक्य नाही. ठाण्यात लकी कंपाउंड  सारखी घटना घडली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. तशी घटना पावसाळ्यात पुन्हा झाल्यास पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर सदोष  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष आणि पालिका विरोधी पक्षनेते यांनी पत्रकार परिषदेत केली. ठाण्याला क्लस्टर  योजना लागू होणार अशी होर्डिंग लावून श्रेय लाटणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजना ठाण्यात लागू करण्यासाठी अपयशी ठरल्याची नैतिक  जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
क्लस्टर योजना मुंबई उपनगरात लागू करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. या योजनेतून ठाण्याला वगळण्यात आले. न्यायालयात ठाणे परिसरातील डबघाईला  आलेल्या इमारतींचे विदारक चित्र सादर करण्यात पालकमंत्री कमी पडले. ठाणेकरांचे पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे याना क्लस्टरचा पाठपुरावा  करण्यात अपयश आले आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष आनंद  परांजपे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तर ठाण्यात हजारो इमारती या धोकादायक आहेत. या इमारतींचा विकास आणि नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लस्टर  योजनाच योग्य होती. न्यायालयात आवश्यक ते दस्तावेज सादर केल्यानंतरही न्यायालयाने क्लस्टर मुंबई उपनगरात लागू करण्याचे निर्देश दिल्याने यापूर्वीच  पालकमंत्री यांनी ठान्याल क्लस्टर योजना लागू केल्याचे होर्डिंग लावले होते. प्रत्यक्षात क्लस्टरला बगल दिल्याने पालकमंत्र्यांनी ठाणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप  राष्ट्रवादीने केला.