शेतकर्यांच्या संपाबाबत आत्मपरिक्षण करू - पंकजा मुंडे
औरंगाबाद, दि. 02 - शेतक-यांच्या संपाबाबत सरकारआत्मपरीक्षण करेल मात्र हा संप वेदनादायी असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले. शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याला आधार दिला पाहिजे याची सरकारला जाणीव आहे. मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारचे शेतकर्यांसाठीचे काम आता दिसू लागले आहे. मागील सरकारने तर घोषणाही केल्या नव्हत्या. मागेल त्याला शेततळे या योजनेचा परिणाम आता दिसू लागला आहे. मराठवाड्यात हेलिकॉप्टरमधून फिरताना आता शेततळे दिसतील असे त्या म्हणाल्या. राजकारणामध्ये टीका सहन करण्याची क्षमता ठेवावी लागते. राजकारण्यांनी अहंकारात राहू नये. असे सांगून त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त 3 जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळीत येणार आहेत. मराठवाड्यासह नगर ते बीड मार्गे परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बीडसाठी रेल्वे वाहतूक महत्त्वाची आहे. बीडमध्ये 19 किमी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेशी संबंधीत उद्योग सुरु व्हावेत. पाणी कमी लागणारे उद्योग यावेत. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मुलींसाठी नॅपकीनचे उत्पादन बचतगटांकडून करून घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राम विकासखाते सर्वाधिक योजना राबवित असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.