Breaking News

कापडावर जीएसटी लागू केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

अहमदनगर, दि. 28 - संपूर्ण देशात 1 जुलै पासून (30 जून च्या मध्यरात्री पासून)जीएसटी लागू करण्यात येणार आहे.नव्याने करण्यात आलेल्या या कर प्रणालीत  कापडावर जीएसटी लागू करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ अहमदनगर मधील सर्व कापड व्यापार्यांनी बुधवारी(28 जून)आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला  असल्याची माहिती अहमदनगर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर सारडा यांनी दिली.
सारडा म्हणाले,कापड की सर्वसामान्य नागरिकाची मूलभूत गरज बनली आहे.असे असूनही केंद्र सरकारने कापडावर जीएसटी लागू केला आहे.तसेच जीएसटी लागू  करतांना कापड व्यापार्यांवर काही जाचक अटी देखील लादण्यात आल्या आहेत.त्यामुळे देशभरातील कापड व्यापारी अडचणीत सापडले आहेत. त्यानंतर जीएसटीच्या  निषेधार्थ देशभरातील कापड व्यापा-यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या बंद मध्ये कापडासाठी प्रसिध्द असलेल्या गुजराथ  मधील सुरत सहीत देशातील कापड व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.अहमदनगर शहरातील कापड व्यापार्यांनी बुधवारी (28 जून)एक दिवसाचा बंद  पाळून निषेध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्यामसुंदर सारडा यांनी सांगितले.