माजी सैनिकांना आवाहन
औरंगाबाद, दि. 01 - राठा लाईट इंन्फट्री रेजिमेंट सेंटर, शिवाजी स्टेडियम, बेळगाव येथे दि. 12 जून, 2017 पासून युद्धविधवा/ माजी सैनिक व विधवांचे पाल्यांसाठी सोल्जर जी. डी. सोल्जर ट्रेडमॅनची व सोल्जर (क्लर्क) युनिट कोटा सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी सर्व शैक्षणिक मुळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित सांक्षांकित केलेल्या प्रतीसह उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर्मी रिक्रृटमेंट ऑफीस, औरंगाबाद तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद येथे दूरध्वनी क्रमांक 0240-2370313 वर संपर्क करावा.