विदयार्थ्यांनी ऐनवेळी विषय बदलल्यामुळे बारावीचे काही निकाल राखीव
औरंगाबाद, दि. 01 - फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दि. 30 मे, 2017 रोजी जाहीर झालेला आहे. 345 विद्यार्थ्यांची राखीव असलेले निकाल हे संबंधित कॉलेजने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण मंडळास न कळविल्यामुळे तसेच ऐनवेळी विषय बदलल्यामुळे निकाल राखीव आहेत. इ. 10 वीला सामान्य गणित विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इ. 12 वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याने एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव नाही. तसेच गुणपडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दि. 9 जून, 2017 असल्याने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी गुणपडताळणीचे अर्ज मुदतीमध्ये विहित शुल्कासह मंडळ कार्यालयात सादर करावेत, असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, औरंगाबाद यांनी कळविले आहे.