Breaking News

25 जून रोजी स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू झालेल्या चार कामांचे लोकार्पण

सोलापूर, दि. 01 - स्मार्टसिटी योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 25 जून रोजी स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू झालेल्या चार कामांचे लोकार्पण तर दोन कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या वेळी मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 12 जून रोजी सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये त्या परिसरातील 36 नगरसेवकांची उपस्थिती असणार आहे. 19 रोजी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासोबत बैठक आहे. यामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत उपाययोजनांबद्दल सूचना घेण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी कौन्सिलतर्फे जून रोजी दिवसभर बालाजी सरोवर येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शासकीय प्रतिनिधी, बिल्डर्स, गुंतवणूकदार, प्रायव्हेट स्टेक होल्डर्स, नागरिक प्रतिनिधी आदींना बोलावून त्यांच्याकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. या सेमिनारचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत भविष्यात होणारी कामे प्रकल्पाचाएकूण खर्च- 2247 कोटी. (ट्रान्स्पोर्ट, पाणीपुरवठा, वॉटर कलेक्शन, पब्लिक स्पेस, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, एनटीपीसी, एमएसईबी, पॅन सिटी आदी विविध कामांसाठी) प्रथम टप्प्यातील 283 कोटींचे 11 कोटी व्याज जमा. सिद्धेश्‍वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार देखणे होणार. शहरातील 36 हजार पथदिवे काढून तेथे एलईडी दिवे बसवणार. सिद्धेश्‍वर तलावाच्या विष्णू घाटावर लाइट साउंड सिस्टीम बसवणार. पुरातत्त्वची मंजुरी मिळताच हुतात्मा बागेच्या दोन्ही फेजची कामे होणार. नाइट मार्केटला इव्हनिंग प्लाझा नाव देणार. होम मैदानासमोरील जागा अन्यथा इतरत्र होणार इव्हनिंग प्लाझा. प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार. तलावाची सर्व बाजूंचे सुशोभीकरण करणार. हुतात्मा बागेचे प्रवेशद्वार देखणे होणार.