पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोची मेट्रोचे उद्घाटन
कोच्ची, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी आज कोची मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोची मेट्रोत बसून प्रवास केला. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम आणि ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन उपस्थित होते. मेट्रोमधील प्रवादरम्यान पंतप्रधान मोदी ई. श्रीधरन यांच्याशी बातचीत करत होते. उद्घाटनाचा हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय मैदानात झाला.
ई. श्रीधरन यांनी या योजनेचे सल्लागार म्हणून काम पाहिले. कोची मेट्रोचा विस्तार 27 किमी पर्यंत असणार आहे. या योजनेसाठी 5 हजार 180 कोटी रूपयांचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले आहे . 13.3 किमी या पहिल्या टप्प्यात 11 स्थानके असतील. तर 25 किमीच्या प्रवासात 22 स्थानके असतील. त्याचबरोबर येथे भारतातील एकमेव मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टिम आहे. या मेट्रोचे वैशिष्ट्य असे की यात ट्रान्सजेंडर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 23 ट्रान्सजेंडर लोकांनी काम सुरूही केले आहे.