दार्जिलिंगमध्ये आंदोलनादरम्यान गोळीबार, दोघांचा मृत्यू
दार्जिलिंग, दि. 18 - दार्जिलिंगमध्ये पुन्हा एकदा पोलीस व गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या समर्थकांमध्ये चकमक उडून त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगड व बाटल्या फेकून मारल्या. त्यावर पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या समर्थकांवर लाठीमार केला . तसेच अश्रुधुराच्या नळकाड्यांचा वापर केला. पोलिसांनी रबर बुलेटचाही वापर केल्याचे समजते. वेगळ्या गोरखालँडच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.
