Breaking News

ढुम्या डोंगरावर अडीच हजार बिजारोपन

अकोले, दि. 28 - गणोरे जवळे कडलग व वडगाव लांडगा येथील कराटेचे विद्यार्थ्यांनी ‘ढुम्या’ डोंगरावर जवळपास अडीच हजार वेगवेगळ्या बियांचे रोपण  करुन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतुन सुरू झालेले दंडकारण्य अभियान राबविण्यात आले.
रमजान ईदच्या सुट्टीच्या दिवशी जयहिंद युवा मंचच्या कराटेच्या विद्यार्थ्यांनी गणोरे, जवळे कडलग, वडगाव लांडगा या तीन गावाच्या शिवेवर असलेल्या ढुम्या डोंगरावर जाऊन दंडकारण्य अभियानास सुरवात केली. यामध्ये सीताफळ, चिंच, जांभूळ, सुबाभूळ, गुलमोहर, बकान इत्यादी अडीच हजार बियांचे रोपन केले. यावेळी गणोरे, जवळे कडलग व वडगाव लांडगा येथील कराटेचे 52 मुले सहभागी झाले होते.
परिसरात सर्वत्र पावसाळा कमी व  उन्हाळा जास्त असुनही उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी  वृक्षारोपण  काळाची गरज आहे. संगमनेर तालुका कराटे असोसिएशनचे राहुल कडलग यांच्या या कराटेच्या विद्यार्थ्यांनी ढुम्या डोंगर हिरवळीने नटवण्याचा ध्यासच घेतला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतुन सुरू झालेल्या दंडकारण्य अभियान मागील अकरा वर्षात राबविले जात आहे.
याची प्रेरणा व इच्छा यामुळे जयहिंद युवा मंच व कराटेच्या विद्यार्थ्यांनी ढुम्या डोंगरावर जाऊन वेगवेगळ्या बियांची पेरणी असल्याचे राहुल कडलग यांनी सांगितले.