Breaking News

मनसेचा म्हशींना दुग्धाभिषेक! तर शिवसेनेचाही पाठिंबा

बुलडाणा, दि. 07 - शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी प्रथमच 1 जूनपासून पुकारलेल्या संपाला मेहकरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पाठिंबा देत म्हशींना दुग्धाभिषेक केला व जनावरांना भाजीपाला खाऊ  घालून सरकारचा निषेध नोंदविला. 
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकर्‍यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळालाच पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी 1 जून   पासून राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. शेतकर्‍यांच्या या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी कार्यकर्त्यांसह पाठिंबा देत 5 जून रोजी शहरातील लोणार वेस येथे म्हशींना दुग्धाभिषेक घातला. जनावरांनाभाजीपाला खायला देत आंदोलनाला आक्रमक पाठिंबा दिला. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, विजय काटकर, सुधीर रायते, मारोती मुळे, परमेश्‍वर मानघाले, विनोद मानघाले, संजय जाधव, किसन मानघाले, राजेश बोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शिवसेनेचा पाठिंबा
शेतकर्‍यांनी 5 जून रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला मेहकर शिवसेनेच्या वतीने उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेने शहरातील व्यापार्‍यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती.
शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा म्हणून   शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रामूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, न.प.उपाध्यक्ष तथा शहरप्रमुख जयचंद बाठिया, सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे, माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के, दुर्गाप्रसाद रहाटे, बबनराव भोसले, शिक्षण सभापती रामेश्‍वर भिसे, पाणीपुरवठा सभापती ओम सौभागे, आरोग्य सभापती मनोज जाधव, अर्थ व नियोजन सभापती तौफिक कुरेशी,  नगरसेवक पिंटू सर्जन, विकास जोशी, माधव तायडे, गणेश लष्कर, रामेश्‍वर बोरे, राजू चव्हाण, संजय खंडागळे, विलास आखाडे, मारुती   जुनघरे, मनोज घोडे, भूजंगराव म्हस्के, आकाश ढोरे, ललित रहाटे, समाधान सास्ते, रामा बोडखे आदींसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येनेउपस्थित होते. यावेळी  शिवसेनेने जिजाऊ चौकात दूध व कांदे रस्त्यावर फेकून शेतकर्‍यांच्या बंदला पाठिंबा दिला.